शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६

ज्ञान(???)

ज्ञान(???)


पुस्तकांनी भरलीत कपाटं, हार्डडिस्क मधेही जागा नाही,

पण 'ज्ञान' आणि 'कर्मा'ला जोडणारा इंटरनेट वर धागा नाही....



हातामधे आहे GPS तरुणाच्या 

पण कुठे जायचंय कळत नाही,
कशासाठी जगतोय आपण 
याचच उत्तर मिळत नाही......



पैसा घेऊन ज्ञान विकण्याचा सर्वत्र मोठा बाजार झालाय,

'स्वत:'साठीच जगण्याचा प्रत्येकाला आजार झालाय.....



एकमेकांना लाथाळत वर जाणारी

माणसं(?) सर्वत्र भेटू लागलीय,
जमिनीवर पाय ठेवायचीही
लाज सर्वांना वाटू लागलीय.....



पैशाला इथं किम्मत आलीय मोल सरलय इथलं घामाचं,

यालाच जर म्हणतात 'ज्ञान',
मग असलं 'ज्ञान' काय कामाचं, असलं 'ज्ञान' काय कामाचं......


:) कवी-तुषार वाजे :)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा