शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१६

भेटीचा शेवटचा दिवस....

भेटीचा शेवटचा दिवस....*

काय कमावलं काय गमावलं,
याचा हिशोब आज नाही करायचा...
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !


भेटीची तो पहिला दिवस आणि आजचा शेवटचा दिवस....
बघता बघता दोन वर्ष फुलपाखरासारखी उडुन गेली,
विरहाच्या या तळमळीने मने आकांत बुडून गेली.
पण या बुडत्या मनांना आपणच सावरायचं,
मैत्रीच्या छायेत आणून दु:खापासून आवरायचं...
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !


अनेक चुकाही झाल्या असतील माझ्याकडुन अनेक निर्णयही चुकले असतील माझ्याकडुन,
पण आज ते सारं विसरुन जायचं जगुन घेता येईल तेवढं आनंदात जगायचं.....
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !
दहा होते वेडे....


या दोन वर्षातील आठवणी आठवून दाटून येतील ह्रदये.
अश्रू माझ्याही डोळ्यात येतील रडावसं तुम्हाला ही वाटेल.
पण आज तुम्ही नाही रडायचं, स्वतःला सावरून फक्त माझेच अश्रू पुसायचे.
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !


या दोन वर्षातील आठवणींचं मनात एक घर तयार करायचं,
मैत्रीच्या या नात्याचं त्याला कुंपण सुध्दा घालायचं.
पण त्या घरात आता कुणीच नाही रहायचं.
ती अँडव्हान्स बुकींग राहू द्यायची ; आयुष्याच्या थकलेल्या सायंकाळी निपचीत पडण्यासाठी....
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !


या कॉलेज मधील आठवणींना कैद करुन ठेवायचं, 
केलेल्या दंगामस्तीला ह्रदयात भरून ठेवायचं.
जमेल तेवढी सुख-दु:ख गोळा करायची आणि त्या सा-याची एक गुलकंदाची बरणी भरायची,
आठवणींना भुकेलेल्या दिवसांत चाखायला...
पण हे सारं आजच करायचं,
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !

               


दाभोसा ट्रीप
                       

जाता जाता सर्वांनी एक निर्णय घ्यायचा.
आपल्या या मातेच्या 'माझी मुलं' या शब्दाचा विसर नाही पडू द्यायचा.
त्याच प्रेमाला आठवून आकाशी उंच झेप घ्यायची,
आपल्या या मातेची ही पापणी आनंदाने पाणावलेली पहायची.
पण हे सारं आजच ठरवायचं,
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !


शेवटी जाता जाता सर्वांनी मला वचन द्यायचं,
स्वतःला सावरून हसतच रहायचं.
नाही फोन निदान मिस काँल तरी द्यायचा,
तुमचा नाही निदान माझा तरी रुपया घालवायचा.
पण हा रुपया कधीच नाही मागायचा,
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !



नाही मिस काँल दिला तरी निदान एक करा,
तुषार वाजे नावाचा इसम फेसबुक वर तरी सर्च करा.
तुमच्या रिक्वेस्टची मी जन्मभर वाट पाहीन,
तुमच्या या मैत्रीचा, तुमच्या या स्नेहाचा हा तुषार वाजे आयुष्यभर ऋणी राहील, आयुष्यभर ऋणी राहील.



     ♥♥*By-तुषार वाजे*♥♥

दि.३० आँगस्ट २०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा