गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

हस देगी भारत माँ भी ....


!!हम सब एक है !!

फिरसे आज इस धरती का लाल 

वतन के खातीर मर गया,

जाने कितनो की आँखे 

आसुओ से वह भर गया |


ऐसे हि कितने वीरो ने 

सीने पर गोली झेली है ,

अपने माँ के रक्षा खातीर 

खून से होली खेली है |


धरम न देखा जाती न पुछी 

जिनके लिये वह लड़ रहे है , 

बरफ, पानी और रेगिस्तान मे

दुश्मन पर भारी पड रहे है |


पर न जाने देशवासियो 

तुमको यह क्या हो गया है ?

धरम जात के रंग मे कही पे 

रंग मानवता का खो गया है |



गीता समझी, कुराण जाना 

बायबल भी हम पढ रहे है ,

पर न जाने धरम के नाम

अपनो मे क्यो लड़ रहे है | 


आपस आपस में लड़ना 
ना धरम कोई सिखाता है ,

सच्ची राह है मानवता की  

हर धर्मग्रंथ वह दिखाता है | 


हस देगी भारत माँ भी 

जब रास्ते हमारे नेक हो जाये 

मानव मानव मे भेद भूलकर 

चलो हम सब एक हो जाये !!!



जय हिंद ! वंदे मातरम !!


-तुषार वाजे (नाशिक)

शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६

ज्ञान(???)

ज्ञान(???)


पुस्तकांनी भरलीत कपाटं, हार्डडिस्क मधेही जागा नाही,

पण 'ज्ञान' आणि 'कर्मा'ला जोडणारा इंटरनेट वर धागा नाही....



हातामधे आहे GPS तरुणाच्या 

पण कुठे जायचंय कळत नाही,
कशासाठी जगतोय आपण 
याचच उत्तर मिळत नाही......



पैसा घेऊन ज्ञान विकण्याचा सर्वत्र मोठा बाजार झालाय,

'स्वत:'साठीच जगण्याचा प्रत्येकाला आजार झालाय.....



एकमेकांना लाथाळत वर जाणारी

माणसं(?) सर्वत्र भेटू लागलीय,
जमिनीवर पाय ठेवायचीही
लाज सर्वांना वाटू लागलीय.....



पैशाला इथं किम्मत आलीय मोल सरलय इथलं घामाचं,

यालाच जर म्हणतात 'ज्ञान',
मग असलं 'ज्ञान' काय कामाचं, असलं 'ज्ञान' काय कामाचं......


:) कवी-तुषार वाजे :)

शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१६

भेटीचा शेवटचा दिवस....

भेटीचा शेवटचा दिवस....*

काय कमावलं काय गमावलं,
याचा हिशोब आज नाही करायचा...
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !


भेटीची तो पहिला दिवस आणि आजचा शेवटचा दिवस....
बघता बघता दोन वर्ष फुलपाखरासारखी उडुन गेली,
विरहाच्या या तळमळीने मने आकांत बुडून गेली.
पण या बुडत्या मनांना आपणच सावरायचं,
मैत्रीच्या छायेत आणून दु:खापासून आवरायचं...
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !


अनेक चुकाही झाल्या असतील माझ्याकडुन अनेक निर्णयही चुकले असतील माझ्याकडुन,
पण आज ते सारं विसरुन जायचं जगुन घेता येईल तेवढं आनंदात जगायचं.....
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !
दहा होते वेडे....


या दोन वर्षातील आठवणी आठवून दाटून येतील ह्रदये.
अश्रू माझ्याही डोळ्यात येतील रडावसं तुम्हाला ही वाटेल.
पण आज तुम्ही नाही रडायचं, स्वतःला सावरून फक्त माझेच अश्रू पुसायचे.
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !


या दोन वर्षातील आठवणींचं मनात एक घर तयार करायचं,
मैत्रीच्या या नात्याचं त्याला कुंपण सुध्दा घालायचं.
पण त्या घरात आता कुणीच नाही रहायचं.
ती अँडव्हान्स बुकींग राहू द्यायची ; आयुष्याच्या थकलेल्या सायंकाळी निपचीत पडण्यासाठी....
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !


या कॉलेज मधील आठवणींना कैद करुन ठेवायचं, 
केलेल्या दंगामस्तीला ह्रदयात भरून ठेवायचं.
जमेल तेवढी सुख-दु:ख गोळा करायची आणि त्या सा-याची एक गुलकंदाची बरणी भरायची,
आठवणींना भुकेलेल्या दिवसांत चाखायला...
पण हे सारं आजच करायचं,
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !

               


दाभोसा ट्रीप
                       

जाता जाता सर्वांनी एक निर्णय घ्यायचा.
आपल्या या मातेच्या 'माझी मुलं' या शब्दाचा विसर नाही पडू द्यायचा.
त्याच प्रेमाला आठवून आकाशी उंच झेप घ्यायची,
आपल्या या मातेची ही पापणी आनंदाने पाणावलेली पहायची.
पण हे सारं आजच ठरवायचं,
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !


शेवटी जाता जाता सर्वांनी मला वचन द्यायचं,
स्वतःला सावरून हसतच रहायचं.
नाही फोन निदान मिस काँल तरी द्यायचा,
तुमचा नाही निदान माझा तरी रुपया घालवायचा.
पण हा रुपया कधीच नाही मागायचा,
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !



नाही मिस काँल दिला तरी निदान एक करा,
तुषार वाजे नावाचा इसम फेसबुक वर तरी सर्च करा.
तुमच्या रिक्वेस्टची मी जन्मभर वाट पाहीन,
तुमच्या या मैत्रीचा, तुमच्या या स्नेहाचा हा तुषार वाजे आयुष्यभर ऋणी राहील, आयुष्यभर ऋणी राहील.



     ♥♥*By-तुषार वाजे*♥♥

दि.३० आँगस्ट २०११

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१६

*हजारो आठवणी राहून गेल्यात....

*हजारो आठवणी राहून गेल्यात....


केव्हाची वाट पाहिली होती या दिवसाची,

पुढची स्वप्नं रंगवून ठेवली होती केव्हाची.
खुप उतावीळ होतो येथून जाण्यासाठी,
आयुष्याचे पुढचे वळण घेण्यासाठी.
पण का कोण जाणे ह्रदय आज दाटतंय,
वेळेला थांबवावसं सारखं वाटतंय.
का कोण जाणे आज काहीतरी खुपतंय,
असे का वाटतं की काहीतरी चुकतंय...?
म्हणायचो की खुप कठीण ही २ वर्षे जगुन गेलोय...,
पण आज वाटतंय काहीतरी नक्कीच मागे विसरुन गेलोय.....!
ज्ञात-अज्ञात अशा अनेक गोष्टी राहून गेल्या,
न विसरता येणा~या हजारो आठवणी राहून गेल्या.




आता पाठीमागून गुपचुप येऊन डोक्यात टपली कोण मारील,
माझं डोकं खाण्यासाठी कोण माझा पीछा करील?
उद्या जिथे २-२ हजारांचा हिशोब नसेल,
तिथे २-२ रुपयांसाठी कोण भांडण करीन,
रात्रभर जागुन आता दंगामस्ती कोण करीन?
कोण एकमेकांचा डबा न विचारता खाईल,
कोण आता मला नव्या नव्या नावाने हाक देईल?
मी आता विनाकारण कुणाशी भांडण करु, विना टाँपिक बकवास कुणासोबत करु?
कोण आता कमी मार्क पडल्यावर धीर देईन, कोण चुकून नंबर आल्यावर शिव्या देईन?
नवनवीन ठिकाणं आता कुणासोबत बघु,
रम्य ते जीवन एकटा कसा जगु.


असाच एक उनाड दिवस...sunset point 

खरंच असे मित्र कुठे मिळतील जे दरीत धक्का देतील, अन् वाचवायला स्वत:ही उडी घेतील.

माझे टाँट ऐकून त्रासून कोण जाईल,
कधी मला शांत बघुन हैरान कोण होईल?
कोण म्हणेल की तुषार तुझ्या जोकवर हसायला नाही येत, कोण म्हणेल मित्रा तुझ्याशिवाय कोण साथ नाही देत.
दंगामस्तीचा खेळ आता कुणासोबत खेळेन, कुणासोबत आता कंटाळवाणे लेक्चर झेलेन?
सरांच्या PJ वर पाठीमागून राक्षसासारखा कोण हसेल,
हारणा-याकडनं पार्टी अशा पैजेत आता कोण फसेल...?
माझ्या सर्टीफीकेट्सला रद्दी म्हणण्याची हिम्मत कोण करेल,
माझ्यासाठी खरा सल्ला देण्याचं धाडस कोण करेल.....?
डेस्कवर आता मी कुणासोबत जाईल, ज्युनियर्सला फालतूचे सल्ले कसे देईल?
अचानक.... विनाकारण.... कुणालाही पाहून वेड्यासारखं हसणं कुणास ठाउक कधी होईल,
एकदा तरी म्हणा ना दोस्तांनो पुन्हा सारं होईल....!


परीक्षेला जाता जाता .....2011

मित्रांसाठी सर/ मॅडम शी आता कोण भांडेल,

पुन्हा हसण्या-रडण्याचा डाव कोण मांडेल ?
रात्रीचे २-२ वाजता ढाब्यावर चहा प्यायला कोण जाईल,
आपल्या बेसूर आवाजात खास मित्रांसाठी गाणं कोण गाईल?
कोण मला माझ्या हुशारीचा भरोसा देईल आणि कोण मला हवेत जास्त उडाल्यावर पुन्हा जमीनीवर घेउन येईल?
माझ्या आनंदात खरंच आनंदी कोण होईल, माझ्या दु:खात माझ्यापेक्षा दु:खी कोण होईल....?
माझी ही कविता कोण वाचेल,
कोण तिला खरंच समजेल?
पाक्षिक भागशाळा ....अविस्मरणीय दिवस 2011




खुप काही लिहायचे बाकी आहे, काही साथ बहुतेक बाकी आहे.

फक्त एकाच गोष्टीची भिती वाटते मित्रांनो, आपण अनोळखी ना बनून जावो मित्रांनो.
जीवनाच्या रंगात मैत्रीचा रंग फिका ना पडून जावो (मित्रांनो),
कधी असे ना होवो की दुस-या नात्याच्या गर्दीत मैत्रीच हरवून जावो (मित्रांनो).
जीवनात पुन्हा भेटण्याचं वचन देत जा,
जर नाहीच कधी भेटता आलं तर आठवण काढत जा.
पाहीजे तेवढे हसून घ्या आज माझ्यावर मी वाईट नाही वाटुन घेणार,
ह्याच हसण्याला ह्रदयात साठवून घेणार, अन् आठवण येईल जेव्हा तुमची तेच हसु थोडसं गालावर येऊ देणार.
...तुषार है मेरा नाम , और ये था मेरे दोस्तो के लिए एक छोटासा पैगाम....


     ♥♥*तुषार वाजे*♥♥


सोम. दि.०९ जुलै २०१२

वेळ- सायं.०५:३५ मि.

शनिवार, ३० जानेवारी, २०१६

प्रिय बापू, तुम्हाला विनम्र अभिवादन !


प्रिय बापू,
      तुम्हाला विनम्र अभिवादन ! 
     काल तुमची पुण्यतिथी होती. त्यानिमित्त तुमच्या सत्य , अहिंसा , स्वदेशी ह्या  सा-याच गुणांचं स्मरण केलं बरं आम्ही. एवढंच नाही तर त्यावर व्याख्यानही भरवलं होतं. फक्त कालच नाही , दरवर्षी नित्याने करतो हे सारं आम्ही. एक तुमच्या जयंतीला अन दुसरं ते पुण्यस्मरणाला. 
          चार दिवसापूर्वी प्रजासत्ताकाला कानावर एक घोषणा पडली . तशी लहानपणापासूनच घोकत आलोय आम्ही ती. "एक रुपया चांदीचा, सारा देश गांधीचा"....! पण आता विचार करावासा वाटतोय या घोषणेचा . सारा देश तुमचा झाला बापू पण तुम्हाला मात्र कधीच या देशाने आपलं मानलंय का ? तुमच्या मागे ना कोणी जात ना धर्म यासाठी टीपं गाळताना पाहिलंय आम्ही तुम्हाला कुसुमाग्रजांच्या कवितेत.....!
    बापू, आज तुमच्या नावाने एक विचारसरणी उदयास आलीय. आम्ही तिला गांधीवादी विचारसरणी म्हणतो. पण बापू तरीही आज भांडतोय आम्ही तुमचं जाणं हे 'वध' होता कि 'हत्या' यावरून ! त्या दिवशी तर एक सो कॉल्ड पुरोगामी म्हणवून घेणाऱ्याच्या गाडीवर "होय! मी 'तोच' गोडसे ...." लिहिलेलं वाचलं. मन अगदी सुन्न झालं ते वाचून . तुमच्या हत्येचं समर्थन होऊच कसं शकतं हेच कळत नाही अजून . 
    आजचा युवान तर वयाच्या विसाव्या वर्षीच विचाराने वृध्द झालाय बापू. तुमचे सत्याचे प्रयोग आम्ही कधी वाचलेच नाही अन वाचलेच तर कधी पचले नाही . जातिवाद, प्रांतवाद ,भोगवाद असल्या वादांमध्ये गुरफटून गेलोय आम्ही .....
        माझा एक मित्र त्याच्या एका कवितेत खूप मार्मिक लिहितो की, "आजही तुमचं स्मरण नित्यानं करतोय आम्ही पण अनुकरण मात्र निमित्ताने ...." खरय त्याचं. 
     तुमच्या सारख्या सत्पुरुषांच्या पुतळ्याकडे बघून तुमच्या विचारांचं अनुकरण करावं हा हेतू असताना आम्ही मात्र फक्त पुतळ्याच्या अनावरणाचे सोहळेच घडवून आणले.
     तसे तुमचे स्मरण आम्हाला नित्याने होते बरं बापू. रोज तुम्हाला स्मरतो , पुजतो आणि खिशात घेऊन फिरतो. कुठे काळ्या तर कुठे पांढऱ्या रंगामध्ये .....
     तसं पाहायला गेलं तर आमच्या मुळाक्षरांची सुरुवातच 'अ' या अक्षराने होते पण तुमच्या अहिंसेतला 'अ' मात्र कधीच आमच्या स्मरणात राहिला नाही. 
   म्हणून मी मागे तुमच्या जयंतीलाही तुम्हाला बोललो होतो बापू , तुम्हाला परत यायचं असेल तर खुशाल या , पण सत्य , अहिंसा अन स्वदेशीचा नाद सोडणार असाल तरच !!!
                                                                                     
   -तुषार निवृत्ती वाजे (नाशिक)
संपर्क -9273572706

कविता🌹"माय"🌹👇

ही कविता प्रत्येक आईला समर्पित .....🌹🙏

🌹कवी 👉तुषार वाजे (नाशिक)🌹

कविता🌹"माय"🌹👇

त्या दिवशी मायबरोबर चालताना,
अंगठ्याला माझ्या ठेच लागली.....
मी खाली वाकायच्या आत 
माय माझी खाली वाकली.....

मागचा पुढचा विचार न करता 
टर्रकन पदर फाडला तिनं....
अंगठ्याला बांधाया नव्या को-या लुगडयाचा,
हातभर तुकडा काढला तिनं....

डोळेच भरुन आले माझे 
मायची माया पाहताना.....😥
माझ्या अंगठ्याच्या रक्तासोबत
मायचे डोळे वाहताना.....😥😥

तिची खरच काय सांगू गाथा
एक आयुष्य पूरनार नाही...
आभाळाचा कागद अन सागराची शाईसुद्धा📝
तिची महती सांगताना उरणार नाही....

मोठ्या लोकांच्या भाऊगर्दीत मला

माणूस जोडायला शिकवला तिनं.....👬
लहानपणापासून आम्हा भावंडांत
संस्काराचा मळा पिकवला तिनं.......🌹💐

प्रत्येक थंडीत कुडकुड़ताना
माय माझी रग झाली....
मायच्या कुशीत झोपल्यावर
मायच माझं जग झाली.....

खरच,
कातडीचे जरी केले जोड़े
तरी ऋण तिचं फिटनार नाही.....
देव जरी आला साक्षात
तरी माझ्या मायची माया भेटनार नाही....😍

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏

कवी👉🌹तुषार वाजे🌹......

प्रिय माय मराठी....

प्रिय माय मराठी,
     लेखणीतून शब्द झरण्या
     भावनांची जाण दे.......
     भावनेला अर्थ मिळण्या,
     मज तव शब्दांचे दान दे .....
                       ✒तुषार ✒